एखादं कुटुंब चालवणे एक कुटुंब प्रमुखाला जसे एका दिव्यातून घेऊन जात असतं अगदी तसंच एखादी संस्था चालवणे किंवा तिच्या सुरूवातीपासून तिला विस्तारा पर्यंत घेऊन जाणार हेसुद्धा एक आव्हानात्मक काम आहे. ज्ञानदीप शिक्षण संस्थेची सुरुवात २०१३ साली शिक्षणानंतर समोर उभ्या राहिलेल्या प्रवासामुळे झाली. एखाद्या शिक्षण संस्थेत आपल्याला नोकरी मिळते का? असा प्रश्न काही ठिकाणी विचारला असता त्या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर हे पदरी पडत होते. आसपास पंचक्रोशीमध्ये आम्ही ज्या सरकारी शाळेत शिकलो ते शिक्षण आम्हाला इथपर्यंत घेऊन आले होते परंतु यापुढची आव्हान ही अजूनही वेगळी असणार होती. याची चाहूल आम्हाला लागली होती. ज्ञानदीप शिक्षण संस्थेचा पहिला विचार हा इथूनच जन्माला आला. आपल्या पंचक्रोशीत इंग्रजी माध्यमांचं शिक्षण सुरू व्हावं आणि इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळावा हा एक आव्हानात्मक हेतू घेऊन आपण ज्ञानदीप शिक्षण संस्थेचा पाया रचायचा ठरवला; ज्ञानदीप शिक्षण संस्था जन्माला येताना समोर येणाऱ्या आव्हानांमध्ये इच्छाशक्ती भरपूर असली तरी सुद्धा आर्थिक अडचणी ह्या समोर आ वासून उभ्या होत्या पण जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची प्रवृत्ती ही आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा खरा आधार होती.